Thursday, May 8, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

राज्यात पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार

राज्यात पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय


पुणे : राज्यातील एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार येत्या पंधरा दिवसांमध्ये पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार आहे. त्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पदे मिळणार आहेत, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.


भाजपची प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना बावनकुळे यांनी ही घोषणा केली. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यात येणार आहेत. या पदांवर भारतीय जनता पक्षाचे सव्वा लाख कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या पन्नास हजार कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे बूथ लेव्हलचे अध्यक्ष आणि मंडलाध्यक्षांना विशेष कार्यकारी अधिकारी करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.


तर शिवसेनेच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना ही संधी देण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्य सरकार निवडणुकीची तयारी करीत असून कार्यकर्त्यांना या पदांवर संधी देण्यासाठी तातडीची योजना जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या पातळीवरच या नेमणुका होणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज लागणार नाही. त्यामुळे केवळ पंधरा दिवसात या नेमणुका होणार आहेत. त्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या सुमारे पावणे दोन लाख कार्यकर्त्यांना थेट विशेष कार्यकारी अधिकारी करण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजपने आणि शिवसेनेने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

Comments
Add Comment