Tuesday, January 21, 2025
Homeताज्या घडामोडीबेस्टच्या डेपोजमध्ये ‘एमजीएल तेज’ अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी सीएनजी भरण्याची विशेष सुविधा

बेस्टच्या डेपोजमध्ये ‘एमजीएल तेज’ अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी सीएनजी भरण्याची विशेष सुविधा

मुंबई (प्रतिनिधी): भारतातील प्रमुख शहरी गॅस वितरण कंपनी महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) यांनी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट (बीइएसटी) यांच्या सहयोगाने घाटकोपर बेस्ट बस डेपो येथे ‘एमजीएल तेज’ ची सुरूवात केली. या उपक्रमाअंतर्गत ’एमजीएल तेज’ च्या वापरकर्त्यांसाठी विशेष सीएनजी डिस्पेन्सरचे उद्घाटन बीइएसटीचे जनरल मॅनेजर लोकेश चंद्रा आणि एमजीएलचे बोर्ड डायरेक्टर सय्यद शहानवाझ हुसेन यांच्या हस्ते करण्यात आले. एमजीएल डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर संजय शेंडे आणि महानगर गॅस लिमिटेड आणि बीइएसटी मधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या नव्यानेच सुरू केल्या गेलेल्या मोबाइल ऍप्लिकेशनमध्ये चारचाकी सीएनजी वाहनांच्या वापरकर्त्यांना बीइएसटी बस डेपोमधील सीएनजी सुविधेमध्ये रीफ्युएलिंगसाठी विशिष्ट वेळा (टाइम स्लॉट) आरक्षित करता येतील. ‘एमजीएल तेज’ ऍप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्याचा उपयोग करून सीएनजी वाहनधारक त्यांच्या सोयीनुसार आधीपासूनच विशिष्ट वेळ (टाइम स्लॉट) आरक्षित करून लांब रांगेत थांबणे कमी करू शकतील. या डेपोमध्ये ‘एमजीएल तेज’ द्वारे बुकिंग केलेल्या ग्राहकांसाठी एक विशिष्ट सीएनजी डिस्पेन्सर असेल. वापरकर्ते (ग्राहक) सकाळी ९.०० ते संध्याकाळी ७.०० या काळात, आठवड्यातील सर्व दिवशी, सीएनजी भरण्यासाठी विशिष्ट वेळ आरक्षित करू शकतील व डिजिटल माध्यमांद्वारे पैसे भरू शकतील. सध्या, ही सेवा गोरेगाव-ओशीवारा आणि घाटकोपर बस डेपोंमध्ये उपलब्ध आहे आणि अशाच प्रकारची सुविधा मुंबई मधील बीइएसटी व्यवस्थापनाखालील इतर १३ बस डेपोंमध्ये देण्याचे नियोजित आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -