नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे केंद्रीय कायदा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
किरेन रिजिजू यांची आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किरेन रिजिजू हे ईशान्य भारतातील असून त्यांच्याकडे कायदा मंत्रालयाच्या आधी क्रीडा मंत्रालयाचा कारभार होता. नवनियुक्त कायदामंत्री अर्जुन मेघवाल हे राजस्थानमधील असून ते प्रशासकीय अधिकारी देखील राहिले आहेत. मेघवाल यांच्याकडे संसदीय कामकाज राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे.