मुंबई : मुंबईत पावसाळापूर्व अनेक ठिकाणी नालेसफाईची कामे सुरु करण्यात आली आहेत. मुंबईतील नालेसफाईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नालेसफाईची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. ते आज स्वतः जातीने लक्ष घालून नालेसफाईसारख्या कामांची पाहणी करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पावसाळ्याअगोदर नाल्यांची सफाई झाली नाही तर पुरासारखी दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशी कोणतीही दुर्घटना उद्भवू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्याकडून नालेसफाईची पाहणी सुरु करण्यात आली आहे.