मुंबई: भायखळ्यातील घोडपदेव परिसरातील चाळीला भीषण आग लागली असून या आगीत चार घरं जळून खाक झाली आहेत. आग लागलेल्या चाळीचं नाव हारुसिंग शोभराज चाळ आहे.
दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चाळीतील नागरिकांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं आहे. परिसरातील स्थानिक नागरिकांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं समजलं आहे.