पुणे : काँग्रेसच्या लोकांनी लिहिणे वाचणे सोडून दिले आहे, म्हणून त्यांना कळत नाही, पण नरेंद्र मोदींमुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढली व मोदी भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. ७० वर्षात काँग्रेसने केले नाही ते ९ वर्षात मोदी सरकारने केले असे ते म्हणाले.
बालगंधर्व रंगमंदिरात गुरूवारी झालेल्या या बैठकीला ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार, विनोद तावडे, उपस्थित होते.
नड्डा म्हणाले, जगातील ३ र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारताची आहे. मोबाईल ऊत्पादन भारत पुढे. रेल्वे, रस्ते अशा सर्व क्षेत्रात पुढे. कोरोनाची मार सर्व जगाला बसला. पण भारताला नाही. कारण मोदींनी संकटाला संधी मानले. राज्य सरकारच्या कामाचेही मोदी यांनी कौतूक केले. मविआ सरकारच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेसने ७० वर्षात केले नाही, ते ९ वर्षात मोदी सरकारने केले – जे. पी. नड्डा