मुंबई : महाविकास आघाडीत फुट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीत बरंच काही घडायचे असून आणखी दोन बॉम्ब फुटणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आंबेडकर म्हणाले, यापूर्वीच काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे नाना पटोलेंनी स्पष्ट केले होते. आता यापुढेही आणखी बरेच काही घडणार आहे. तसेच दोन बॉम्ब फुटणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
तसेच दोन बॉम्ब फुटल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण स्थिर होणार आहे. त्याआधी महाविकास आघाडीमध्ये नवीन समीकरणं उभी राहणार आहेत. त्यामुळे लोकांनी वेट अॅंड वॉचची भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले.