- समर्थ कृपा : विलास खानोलकर
श्री स्वामींच्या उद्गाराची प्रचिती त्यांना हैदराबादला पोहोचता क्षणी येते. कारण त्यांचे जप्त झालेले उत्पन्न मुक्त करण्याचा हुकूम सरकारातून झालेला असतो. श्री स्वामी समर्थांच्या कृपेची प्रचिती देणाऱ्या अनेक लीलांमधील ही एक लीला आहे.
केज (जि. बीड) महारुद्रराव देशपांडे या धनिकाचे फार मोठे उत्पन्न त्यावेळच्या निजाम सरकारने जप्त केले. ते सुटण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. पण ते सर्व व्यर्थ गेले. तेव्हा ते बीडच्या खडकीकर साधूकडे गेले. त्यांना सर्व हकीकत सांगितली. ते साधू म्हणाले, “अक्कलकोटी श्री परमहंस स्वामी आहेत. त्यांच्याकडे जा म्हणजे तुमचे कार्य होईल, असे वाटते.”
त्यानुसार महारुद्रराव देशपांडे अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थांपुढे श्रीफळ आदी ठेवले. साष्टांग नमस्कार केला आणि उभे राहिले. इतक्यात श्री स्वामी समर्थ म्हणाले, “चार मनोरे आहेत तेथे जा म्हणजे तुमचे शेत सोडून देऊ.” श्री स्वामींचे हे अंतर्ज्ञानाचे बोलणे ऐकून देशपांडे यास मोठे आश्चर्य वाटले. श्री स्वामी समर्थांची आज्ञा घेऊन मोठ्या त्वरेने ते हैदराबादेस आले. त्याच दिवशी जप्त केलेले उत्पन्न सोडून देण्याचा सरकारातून हुकूम झाला होता. हे ऐकून देशपांड्यास परमानंद होऊन ते श्री स्वामी समर्थांचे गुणानुवाद गात अक्कलकोटी आले.
महारुद्रराव देशपांडे यांचे मोठे उत्पन्न जप्त झाल्यावर त्यांना परमेश्वराची तीव्रतेने आठवण झाली. कुणीही कोणत्याही धर्माचा, पंथाचा माणूस संकटात सापडल्यावरच इष्ट देवदेवतेचे स्मरण-धावा विशेष तीव्रतेने करतो. तेच येथे देशपांडे यांनी केले. मदत मार्गदर्शन मिळावे म्हणून ते बीडच्या साधूकडे आले. त्या साधूस श्री स्वामी समर्थ महती ठाऊक होती. म्हणून त्यांनी महारुद्ररावास अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांकडे जाण्यास सांगितले. यावरून श्री समर्थांचा अधिकार फार मोठा होता, हेही स्पष्ट होते. महारुद्रराव देशपांड्यांना बघताच श्री स्वामी स्पष्टपणे सांगतात, “चार मनोरे आहेत तेथे जा म्हणजे तुमचे शेत सोडवून देऊ.“ (चार मनोरे म्हणजे हैदराबाद) हे ऐकून देशपांडे हैदराबादला येतात.
श्री स्वामींच्या उद्गाराची प्रचिती त्यांना हैदराबादला पोहोचता क्षणी येते. कारण त्यांचे जप्त झालेले उत्पन्न मुक्त करण्याचा हुकूम सरकारातून झालेला असतो. श्री स्वामी समर्थांच्या सामर्थ्याची त्यांच्या कृपेची प्रचिती देणाऱ्या अनेक लीलांमधील ही एक लीला आहे.
देशपांडे होते धनिक।
स्वभावाने चांगले प्रमाणिक।।१।।
राजा निझाम कोपला दिनएक।
जमीन, पैसा जप्त केला दिनएक।।२।।
देशपांडे आले स्वामींना शरण।
म्हणाले तया वाचवा माझे मरण।।३।।
स्वामी वदे नको भिऊ भक्ता। तुझा कल्याणाचा चारामिनारचा मक्ता।।४।।
दिशाहीन देशपांडे धावले हैदराबादला।
चारमिनारपाशी राजाने हुकुम दिधला।।५।।
सारी जप्त संपत्ती, जमिनी मुक्त करा।
देशपांडेना त्वरित जप्तीतून मुक्त करा।।६।।
एैसी भक्तावर स्वामींची कृपा। संकटे होती रफादफा।।७।।
स्वामी म्हणे समर्थाचे मंत्र ऐका।
आईवडील कुलस्वामीनेचे आशीर्वाद एका।।८।।
देशपांडे अक्कलकोटी येऊनी नवस फेडला।
१०० ब्राह्मण प्रसाद वाटला।।९।।
ब्रम्हा विष्णू महेशरूपी स्वामींच उभा
संकटात नेहमीच देव स्वामीसमर्थ उभा।।१०।।
स्वामींचा प्रेम संदेश…
स्वामी म्हणे माझे ऐका
आईने जन्मदिला लेका।।११।।
तुझे प्रेम हाच तिला पैका
आशीर्वादाने जिच्या होशील ऐक्का।।१२।।
आई-बाबा पहिला प्रेमळ ऐक्का
आजी आजोबा दुसरा ऐक्का।।१३।।
पणजी पणजोबा तिसरा ऐक्का
शालेय गुरू चवथा ऐक्का।।१४।।
स्वामी समर्थ पृथ्वीचा बादशहा
दत्तगुरू साऱ्या ब्रह्माडांचाच बादशहा।।१५।।
शिवशंकर कैलासाचा बादशहा
देवाधिदेव स्वर्गाचा प्रेमळ बादशहा।।१६।।
प्रेमळ भाऊ-बहीण खरे शहेनशहा
उत्तम निर्वसनीमित्र खरे शहेनशहा।।१७।।
स्वामीसमर्थ अक्कलकोटचे शहेनशहा
गजानन महाराज शेगावचे शहेनशहा।।१८।।
करा नोकरी प्रमाणिक चाकरी
करून धंदा ठेवा सेवेकरी।।१९।।
भरपूर धनधान्य उत्तम शेतकरी
प्रमाणिकपणाची शिळी दूधभाकरी।।२०।।
जगण्याचे आहे प्रेमळ टेक्निक
आकशातील देव त्याचा मॅकेनिक।।२१।।
तो गाडी चालवेल ठाकठीक
वेळेवर काम करा सांभाळा ठाकठीक।।२२।।
योगासनाने संभाळा हृदयाची टिकटिक
भरपूर व्यायामाने करा स्नायू ठाकठीक।।२३।।
सोडा व्यसने तब्येत ठाकठीक
चाला भरपूर सैनिकासारखे टॉकटॉक।।२४।।
चाला भरपूर सैनिकासारखे झाक
राहा ताठ काढू नका पॉक।।२५।।
शिकवा गरीब मुले देऊनी फळा-चॉक
चाला पहाटे करा बागेत वॉक।।२६।।
करा निसर्गावर भरपूर प्रेम
करा पशू-पक्ष्यांवर भरपूर प्रेम।।२७।।
वाचवा नदीनाले करा प्रेम
वाचवा झाडेझुडपे करा प्रेम।।२८।।
गाईगुरे शेळी बकरी करा प्रेम
नका कापू माणूसप्राणी द्या प्रेम।।२९।।
सत्य, अहिंसा, परमोधर्मा प्रेम
बायकोमुले नातू निरंतर प्रेम।।३०।।
साऱ्या जगावर करा प्रेम
प्रत्येक क्षणावर करा प्रेम।।३१।।
सुगंधी गुलाबाने वाटा प्रेम
सुगंधी सोनचाफ्याने वाटा प्रेम।।३२।।
विष्णूप्रीय तुळशीने वाटा प्रेम
सोनटक्क्याने १०० टक्का प्रेम।।३३।।
वाचवा सारी पृथ्वी करा प्रेम
वाचवा, डोंगर हिरवे करू प्रेम।।३४।।
गाई देवून चारा करा प्रेम
चिमणी कावळा दाणापाणी करा प्रेम।।३५।।
भूकंपग्रस्तांना औषध पाणी प्रेम
थांबवा युद्ध मानवतेवर करा प्रेम।।३६।।
बायका मुलांना वाचवा द्या प्रेम
पूरग्रस्तांना दाणापाणी द्या प्रेम।।३७।।
फक्त एकच दिवस नका दाखवू प्रेम
आयुष्यभर करा आईवर प्रेम।।३८।।
रोजच करा आईवर प्रेम
हसत खेळत नाचत बागडत प्रेम।।३९।।
कुलदेवता तुझी आई
भारतमाताही तुझीच आई।।४०।।