Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीजागा वाटपावरून मविआत बिघाडी?

जागा वाटपावरून मविआत बिघाडी?

ठाकरे गटाने ‘या’ दोन लोकसभा मतदारसंघासाठी धरला हट्ट

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी होण्याची शक्यता आहे. लोकसभा जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून २० जागांवर दावा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते तीनही घटकपक्ष लोकसभेच्या समान प्रत्येकी १६ जागा लढवणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे जागा वाटपावरून मविआत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र त्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते लोकसभा निवडणुकीत समाना जागांचं वाटप होणार असल्याचं बोलत आहेत. मात्र यावरून २०१९ मध्ये १८ जागा जिंकणाऱ्या ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाकडून जिंकलेल्या १८ मतदारसंघासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती लोकसभा मतदार संघावर देखील दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता जागावाटपावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार एमआयएमचे इम्तियाज जलिल आहेत. तर अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा या विद्यमान खासदार आहेत. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या दोनही मतदारसंघावर आता ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे. हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ लढवण्यावर ठाकरे गट ठाम असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -