Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

पुण्यात लॉकअपमध्ये आरोपीची आत्महत्या

पुण्यात लॉकअपमध्ये आरोपीची आत्महत्या

पोलीस दलात खळबळ


पुणे : पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या लॉकअपमध्ये एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शिवाजी गरड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. युनिट सहाच्या पथकाने त्याला हडपसर परिसरातील एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.


या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, पांघरूणासाठी दिलेल्या चादरची काठ कापून त्याच्या साहाय्याने त्याने गळफास घेतला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments
Add Comment