नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदी झालेल्या निवडी विरोधात दाखल झालेल्या प्रकरणावर सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी तीस लाख रुपये लाच स्वीकारताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने अवघ्या जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत वैध पद्धतीने निवडून आलेल्या संचालकाच्या निवडीविरोधातील प्रकरणावर सुनावणी घेवून ती तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी तीस लाख रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याप्रकरणी माहिती दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. सदर रक्कम खरे यांच्या राहत्या घरी स्वीकारण्यात आली. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.