
१४ मे ला रात्री किनवटमधील गंगापूर येथे हळदी समारंभादरम्यान डीजे लावला होता. तेवढ्यात इस्लामपुरा येथील दहा जण तिथे आले. त्यांनी गाणी वाजवण्यावर आक्षेप घेतला व डीजे बंद करायला सांगितला. डीजे लावणार्यांनी नकार दिल्यामुळे या दोन्ही गटांमध्ये दगडफेक व हाणामारी सुरु झाली. हे प्रकरण एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत गेले. किनवट पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
यासंबंधी पोलिसांनी एका गटातील ७ तर दुसर्या गटातील ४ अशा ११ जणांना ताब्यात घेतलं आहे. दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता परिस्थिती निवळली असून कोणीही अफवा पसरवू नये व शांतता भंग न करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.