Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंच्या स्पेशल खूर्चीचा प्रवास आता स्टुलाकडे!

उद्धव ठाकरेंच्या स्पेशल खूर्चीचा प्रवास आता स्टुलाकडे!

भाजप आमदार नितेश राणे यांचा चौफेर हल्ला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काल सायंकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेली बैठकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या वागणुकीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी चौफेर हल्ला केला. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची अवस्था ही दरबारातल्या सरदारांसारखी झाली. महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरे मुख्य खुर्चीवर बसले होते. कालच्या बैठकीत त्यांना बसायला जागा नव्हती. ते सोफ्यावर बसले होते. आता ठाकरेंना स्टुलावर बसवतील का ही भीती आहे, अशी जहरी टीका राणेंनी केली.

राणे पत्रकार परिषद घेत म्हणाले, काल सिल्व्हर ओक येथे महाविकास आघाडीची बैठक झाली. त्या बैठकीचे फोटो व्हायरल झाले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वजन होते. त्यांचा वेगळाच रुबाब होता. पूर्वी मातोश्रीवर अनेक नेत्यांची रिघ लागायची. मोठमोठे नेते, कलाकार मातोश्रीवर यायचे. पण उद्धव ठाकरेंना काल सिल्व्हर ओकवर जी वागणूक मिळाली, त्यावर त्यांनी विचार करावा. उद्धव ठाकरे भाजपसोबत असताना त्यांना जो, आदर होता. तो काल दिसला नाही, असे राणेंनी म्हटले.

आज महाविकास आघाडीमध्ये उद्धवजींची काय अवस्था झाली. मविआमध्ये ठाकरेंचा रुबाब कमी झाला. आज परिस्थिती खूप बदलली. ठाकरेंना नीट बसायलाही जागा नव्हती. उद्धव ठाकरेंची गत मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर आली. संजय राऊत सारख्या लोकांच्या नादी लागल्यानं तुमची अवस्था काय झाली. आता सोफ्यावरून तुम्ही स्टुलवर याला अशी भीती वाटते आहे. उद्धव ठाकरेंकडे नेता उरला नाही, आहे तो फक्त कामगार. ही उद्धव सेनेची अवस्था आहे, असे नितेश राणे म्हणाले.

कर्नाटक निवडणुकीवर भाष्य करून राऊतांना काँग्रेसचा मान गमावला आहे. हा एकट्या काँग्रेसचा विजय नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत. नाना पटोले यांना हा अपमान मान्य आहे का? संजय राऊत महाविकास आघाडीत शकुनीमामा आणि नारदमुनी आहेत, महाविकास आघाडीत संजय राऊत नारद मुनीचा रोल करतो, अशी टीका राणेंनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -