Thursday, October 30, 2025
Happy Diwali

पालिकेच्या कामांवर आता दक्षता विभागाची देखरेख

पालिकेच्या कामांवर आता दक्षता विभागाची देखरेख

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सिमेंट क्राँक्रीटचे रस्ते, पुलांची कामे, मुंबईचे सौंदर्यीकरण अशी विविध कामे सुरू आहेत. या कामांत पारदर्शकता असावी यासाठी १० कोटींच्या वरील कामांवर आता पालिकेचा दक्षता विभाग देखरेख करणार आहे.

सिमेंट क्राँक्रीटचे रस्ते, मुंबईचे सौंदर्यीकरण, पुलांची कामे अशी ३५ हजार कोटींची कामे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या सुरू आहेत. सिमेंट क्राँक्रिटचे रस्ते असो वा मुंबईचे सौंदर्यीकरण या कामावर काही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्यात आले असा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र उबाठा सेनेने केलेले आरोप पालिका प्रशासनाने फेटाळले आहेत. पण पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक कामांत पारदर्शकता यावी यासाठी थर्ड पार्टी ऑडिट केले जाते. मात्र आता १० कोटींच्या वरील प्रत्येक कामांवर दक्षता विभागाची नजर असणार आहे.

मुंबईत सध्या ४०० किलोमीटर सिमेंट क्राँक्रीटच्या सहा हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. सुरू असलेली कामे योग्य पद्धतीने होत आहे का?, रस्ते कामांत वापरण्यात येणारे साहित्य योग्य आहे का?, याची तपासणी करण्यासाठी पावसाळापूर्व पाहणी करण्यास सुरुवात केली जाईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment