चेन्नई (वृत्तसंस्था) : सुनिल नरेन, शार्दुल ठाकूर यांच्यासह गोलंदाजी विभागाने केलेली दमदार कामगिरी आणि नितीश राणा, रिंकू सिंह यांची निर्णायक अर्धशतके या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जवर ६ विकेट राखून सहज विजय मिळवला. या विजयामुळे कोलकाताने चेन्नईला त्यांच्याच घरात पराभूत करत मागील पराभवाचे उट्टे काढले. तसेच प्ले ऑफ प्रवेशाच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.
१४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली. दीपक चहरने कोलकाताला सुरुवातीलाच तीन धक्के दिले. रहमनुल्लाह गुरबाज एक धाव काढून बाद झाला. गुरबाजनंतर व्यंकटेश अय्यरही लगेच तंबूत परतला. जेसन रॉयलाही मैदानात तळ ठोकता आला नाही. पॉवर प्लेमध्ये कोलकात्याचे प्रमुख तीन फलंदाज बाद झाले होते. चेन्नईचा संघ येथून सामन्यात बाजी मारणार असे वाटत होते. पण रिंकू सिंह आणि नितीश राणा यांनी कोलकाताचा डाव सावरला. नितीश राणाने नाबाद ५७ धावांची खेळी खेळली. तर रिंकू सिंहने ५४ धावा करत कोलकाताला विजय मिळवून दिला. कोलकाताने ४ गडी गमावून १८.३ षटकांत विजयी लक्ष्य गाठले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात आक्रमक झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वेने ३ षटकांत ३० धावा केल्या होत्या. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि कॉन्वेने सीएसकेला ८ षटकांत ६१ धावांवर पोहचवले. मात्र चक्रवर्तीने अजिंक्य रहाणेचा अडथळा दूर केला. त्यानंतर शिवम दुबेने एकाकी झुंज देत चेन्नईला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. दुबेने नाबाद ४८ धावा फटकवल्या. चेन्नईच्या सुनिल नरेन, शार्दुल ठाकूर यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. नरेनने २, तर ठाकूरने एक विकेट मिळवली.
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…