Thursday, January 15, 2026

जयंत पाटलांना दुस-यांदा समन्स

जयंत पाटलांना दुस-यांदा समन्स

मुंबई : आय.एल.एफ.एस प्रकरणी ईडीने काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लग्नाच्या वाढदिवशीच चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. ही चौकशी १२ मे रोजी होणार होती. मात्र घरात लगीनसराई असल्याने जयंत पाटील यांनी १० दिवसांची मुदतवाढ मागणारे पत्र ईडीला पाठवले होते. ही विनंती ईडीने मान्य केली असून जयंत पाटलांना दुस-यांदा समन्स पाठवला आहे. यानुसार आता २२ मे रोजी ईडी चौकशी होईल.

आय.एल.एफ.एसच्या माध्यमातून अनेकांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. ही नोटीस आल्यानंतर आय.एल.एफ.एस संस्थेशी कुठलाही संबंध नसल्याचं किंवा कोणतंही कर्ज घेतलं नसल्याचं जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितलं होतं. तरीही ही नोटीस आली त्यामुळे जी काही चौकशी असेल त्याला सामोरे जाऊ, असं ते म्हणाले होते.

Comments
Add Comment