Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीयुवकांसाठी भाजपचा युवा संवाद मेळावा

युवकांसाठी भाजपचा युवा संवाद मेळावा

करिअरविषयक मार्गदर्शनाच्या माध्यमातून तरुण मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा प्रयत्न

मुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर लवकरच कमबॅक करु असं म्हटलेल्या भाजपने आगामी लोकसभा, विधानसभा व पालिका निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील असतं. यंदा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने युवा संवाद मेळाव्याचं आयोजन केलं आहे.

१८ मे ला सकाळी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तरुण मतं निर्णायक असतात त्यामुळे जास्तीत जास्त तरुण मते मिळवण्याकडे भाजपचा कल आहे. या युवा संवाद मेळाव्यातून युवकांना करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. १७ मे ला ते मुंबईत येतील आणि १८ मे ला सकाळी हा मेळावा पार पडेल. यामध्ये ते युवकांशी थेट संवाद साधणार असून युवकांना सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे ते जाणून घेणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -