लोकाग्रहास्तव ‘यशोदा’च्या वेळेत झाला बदल...



  • ऐकलंत का!: दीपक परब



दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘यशोदा गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेची कथा यशोदाची म्हणजेच एका अशा आईची आहे, जिने साने गुरुजींना घडवले. ही मालिका आपल्या मुलांवर संस्कार व्हावेत आणि त्यांना संस्कृतीबद्दल कळावं यासाठी सुरू करण्यात आली होती. पण मुलांना दुपारी ही मालिका पाहणे शक्य होत नसल्याने या मालिकेची दुपारची वेळ बदलावी यासाठी अनेक पालकांचे निर्मात्यांना फोन कॉल्स आणि मेल आले होते. त्यामुळे प्रेक्षकांचा आदर राखत निर्मात्यांनी या मालिकेची वेळ बदलली आहे. ‘यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. पण टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका मागे पडली आहे. ‘यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका आता रंगतदार वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत लवकरच यशोदा आणि सदाशिवराव साने यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. हा विवाह विशेष भाग प्रेक्षकांना १६ मे रोजी संध्याकाळी ६ वा. झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.


'यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची' ही मालिका एक नवीन वळण घेणार आहे. अवखळ, अल्लड तसेच अतिशय धीट असलेल्या बयोच्या आयुष्यात नवीन घटना घडणार आहे ती म्हणजे बयोचा लवकरच सदाशिवरावांबरोबर विवाह होणार आहे. प्रेक्षकांची लाडकी बयो आता यशोदा सदाशिवराव साने होणार आहे. सदाशिवराव साने यांच्याबरोबर सहचारिणी म्हणून यशोदेचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. बयोचा वैशाख कृष्ण द्वितीयेला विवाह सोहळा संपन्न होणार आहे. निरनिराळ्या पात्रांची सुरेख गुंफण करुन सुंदर कलाकृती घडवण्याचा प्रयत्न 'यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची' या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 'यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची' या मालिकेची कथा सानेगुरुजींना घडवणाऱ्या त्यांच्या आईच्या आयुष्यावर आधारित आहे.

Comments
Add Comment

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर चलती! दोन दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार

आदित्य धर यांचा वादग्रस्त धुरंधर अखेर ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या

हिंदी 'बिग बॉस सीझन १९' चा अंतिम सोहळा! कोण कोरणार ट्रॉफिवर नाव?

तीन महिन्यांहून अधिक काळ नाट्यमय संघर्ष, युती आणि भावनिक चढ-उतारांनंतर, 'बिग बॉस १९' चा महाअंतिम सोहळा आज पार पडणार

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच