Sunday, August 31, 2025

झाड करी लाड

झाड करी लाड
  • काव्यकोडी: एकनाथ आव्हाड
एका मुलाला बी सापडलं मातीत त्यानं जपून पेरलं... मातीवर शिंपडलं त्यानं पाणी उन्हा-पावसाची म्हटली गाणी... ‘बी’ ने आतून हाक दिली मातीनं दारं खुली केली... ‘बी’ तून छोटंसं रोप आलं मुलाचं मन हरखून गेलं... इवलालं पान मुलाला बोलवी मुलाच्या फुटे मनास पालवी... रोपाचे सुंदर झाड झाले मुलाचे मन हरखून गेले... झाड करी आता मुलाचे लाड आभाळाला म्हणते पाऊस पाड...
  १)लाल रंगाचे तोंड शरीर पांढरे शुभ्र नर मादीची जोडी यांची दिसते नेहमी एकत्र... पाणथळ जागेत फिरतो हा दुर्मीळ पक्षी रुबाबदार स्थलांतरासाठी लांबवर उडण्यात कोण हुशार? २)टोकदार पंख, तल्लख बुद्धी तीक्ष्ण त्याची नजर शिकारी पक्षी म्हणून तर ख्याती त्याची जगभर... हवेला प्रतिकार करणारे शरीर त्याचे निमुळते जगातील या वेगवान पक्ष्याचे नाव बरं कोणते? ३)पावसाच्या थेंबावरच म्हणे हा तहान भागवतो पावसाचे शुभवर्तमान हाच घेऊन येतो... कोकीळ कुटुंबातील हा सदस्य मानला जातो ‘पियू पियू’ आवाजात कोण साद घालतो? उत्तर - १.चातक पक्षी २. ससाणा पक्षी ३.क्रोंच पक्षी eknathavhad23 @gmail.com
Comments
Add Comment