अलिबाबा मालिकेचा सेट जळून खाक

  210

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट


पालघर : 'अलिबाबा : दास्तान ए काबूल' या मालिकेचा पालघर जिल्ह्यात असलेला सेट काल रात्री अचानक जळून खाक झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी १३ मे ला रात्री उशिरा भजनलाल स्टुडिओच्या सेटवर अचानक आग लागली. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले.


या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र या आगीत संपूर्ण सेट जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे.


भजनलाल स्टुडिओच्या याच सेटवर २४ डिसेंबरला अभिनेत्री तुनिषा शर्माने वयाच्या विसाव्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने प्रियकर शिजान खानवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी शिजान खानला तुरुंगवास भोगावा लागला होता. सध्या तो जामिनावर बाहेर असून ‘खतरो के खिलाडी’ या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Comments
Add Comment

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर