आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
पालघर : ‘अलिबाबा : दास्तान ए काबूल’ या मालिकेचा पालघर जिल्ह्यात असलेला सेट काल रात्री अचानक जळून खाक झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी १३ मे ला रात्री उशिरा भजनलाल स्टुडिओच्या सेटवर अचानक आग लागली. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र या आगीत संपूर्ण सेट जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे.
भजनलाल स्टुडिओच्या याच सेटवर २४ डिसेंबरला अभिनेत्री तुनिषा शर्माने वयाच्या विसाव्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने प्रियकर शिजान खानवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी शिजान खानला तुरुंगवास भोगावा लागला होता. सध्या तो जामिनावर बाहेर असून ‘खतरो के खिलाडी’ या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.