
सुधीर मुनगुंटीवार यांनी केला गौप्यस्फोट
मुंबई: पहाटेचा शपथविधी म्हणजे एक गमिनी कावा होता. ते उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी करण्यात आलेले एक राजकीय ऑपरेशन होते, असा गौप्यस्फोट राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे तोंडघशी पडल्याच्या चर्चा रगंल्या आहेत.
सुधीर मुनगुंटीवार पुढे म्हणाले, भाजपशी युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वागले, त्यांना धडा शिकविण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन आम्ही घेतले आणि पहाटेचा शपथविधी झाला.
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचा अवमान केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान केला होता. शिवसैनिकांना सोडून स्वत: मुख्यमंत्री झाले होते. मग अजित पवार सोबत येण्यास तयार झाले. यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, असे समजून तो शपथविधी झाला होता. अजित पवार सोबत आले तेव्हा कोणतीही अट टाकलेली नव्हती. ते उपमुख्यमंत्री होणार होते.
शरद पवारांचा पाठिंबा घेणार
सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार की नाही यावर स्पष्ट वक्तव्य केले. ते म्हणाले, राजकारणात काही वेळा परिस्थितीनुसार काही निर्णय घ्यावे लागतात. अजित पवार भाजपमध्ये येणार, याबाबत मी मिडियातूनच बातम्या पाहात आहे. शरद पवारांनीही उद्या पाठिंबा दिला, तर तो घेणार नाही, असे आम्हाला कसे म्हणता येईल? असा सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केला.