Thursday, July 3, 2025

आयसीएसई, आयएससीचा निकाल जाहीर

आयसीएसई, आयएससीचा निकाल जाहीर

मुंबई: कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स, (सीआयसीएसई) (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (ICSE) म्हणजेच दहावी आणि आयएससी (ISC) (बारावी) परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.


त्यात आयसीएसई (दहावी) बोर्डाचा निकाल हा ९८.९४ टक्के लागला असून आयएससी (बारावी) बोर्डाचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce.org आणि results.cisce.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात.


मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते, जे निकालाची वाट पाहत होते. अखेर आज दुपारी तीन वाजता निकाल जाहीर झाले.


जर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करु शकतात. ही सुविधा आज दुपारी ३ वाजता सुरु होईल आणि २१ मे पर्यंत उपलब्ध राहिल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Comments
Add Comment