नाशिक: उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करू नये, असे वक्तव्य त्यांनी केले होते. हे वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी शनिवारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत, राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने ते बेकायदेशीरच ठरवले आहे. त्यामुळे अशा घटनाबाह्य आणि बेकादेशीर सरकारच्या आदेशांचे पालन करू नये असा आवाहन केले होते. राऊत यांच्या वक्तव्याविरोधात पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.