Sunday, July 6, 2025

सरकारच्या नैतिकतेवरून फडणवीसांनी साधला पवारांसह ठाकरेंवर निशाणा

सरकारच्या नैतिकतेवरून फडणवीसांनी साधला पवारांसह ठाकरेंवर निशाणा

नागपूर (प्रतिनिधी) : सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैर झडत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीकास्त्र सोडले.



या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर येथे जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘शरद पवार यांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली, तर कठीणच होईल आणि मग वसंतदादांच्या सरकारच्या काळातील इतिहासापासून सुरुवात करावी लागेल’, असा टोला फडणवीस यांनी लगावला. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, ‘शरद पवार साहेबांचा नैतिकतेशी संबंध तरी आहे का? त्यांनी भाजपला नैतिकता शिकवायचे ठरवले तर कठीणच होईल. त्यासाठी इतिहासात जावे लागेल. वसंतदादांचे सरकार कसे पडले, येथून सुरुवात करावी लागेल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, ते बोलत असतात. त्याकडे फार लक्ष द्यायचे नसते,’ असा हल्लाबोल फडणवीसांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा