मुंबई: ‘धर्मवीर’या आनंद दिघे यांच्यावरील सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक याने खास पोस्ट लिहिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी लिहिलं की,”आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या सिनेमाला लाभलेले उत्तुंग यश तसेच वर्षपूर्तीनिमित्त सर्वप्रथम वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना विनम्रतापूर्वक अभिवादन करतो. त्याचप्रमाणे या सिनेमाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन”.
वंदनीय गुरुवर्य #धर्मवीर #आनंद_दिघे साहेब यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
या… pic.twitter.com/aTdQzdg2I6
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 13, 2023
‘धर्मवीर’ सिनेमातील आनंद दिघे यांची भूमिका साकारतानाचा एक व्हिडीओ शेअर करत प्रसाद ओकने लिहिलं आहे,” धर्मवीर माझ्या आयुष्यातला या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या भूमिकेने आणि सिनेमाने मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे. पुन्हा एकदा प्रवीण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे आणि धर्मवीरच्या संपूर्ण टीमचे अत्यंत मन:पूर्वक आभार. ‘धर्मवीर 2’ला सुद्धा आपले आशीर्वाद आणि प्रेम भरभरुन मिळेल, अशी आशा करतो. दिघे साहेब असेच कायम पाठीशी रहा”.
View this post on Instagram
दरम्यान, २०२४ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘धर्मवीर 2’ मध्ये आनंद दिघेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.