Monday, October 27, 2025
Happy Diwali

सचिनच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न

सचिनच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न

मुंबई : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मुंबई पोलिसांकडे एका अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. एका अनोळखी व्यक्तीने परवानगीशिवाय सचिनचे नाव, फोटो आणि आवाजाचा वापर करून सचिनच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याबाबत ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

'सचिन हेल्थ डॉट इन' असे नाव असलेल्या संकेतस्थळावरून सचिन तेंडुलकरच्या फोटोंचा वापर करत फार्मास्युटिकल उत्पादनांची जाहिरात केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सचिनने या कंपनीला त्याचे नाव आणि छायाचित्र वापरण्याची परवानगी दिली नव्हती, असे या तक्रारीत म्हटले आहे. सचिनची प्रतिमा डागाळत असल्याने तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणात ५ मे रोजी तक्रारदाराला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एक जाहिरात दाखवण्यात आली. फॅट कमी करणारे स्प्रे विकणारी ही जाहिरात होती. या जाहिरातीत सचिन या उत्पादनांना मान्यता देत असून उत्पादन खरेदीदाराला सचिनच्या स्वाक्षरीचा टी-शर्ट मिळेल असा दावाही केला गेला होता. तेंडुलकरच्या एका सहाय्यकाने गुरूवारी पश्चिम विभागीय पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर सचिनने ट्विट करत " विश्वासार्ह उत्पादने मिळणे आवश्यक असून समुदायांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्मची रिपोर्टिंग आणि ब्लॉकिंग टूल्स वापरा. अधिक सुरक्षित ऑनलाइन वातावरण तयार करण्यासाठी सक्रिय होऊ या" असे आवाहन सचिनने केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा