नवी दिल्ली : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्ती प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. त्यासंबंधी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ४ जुलैला सुप्रीम कोर्टात यासंबंधी सुनावणी होईल. तोपर्यंत स्थगिती आदेश कायम राहतील.
महाराष्ट्र विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या गेल्या ३ वर्षांपासून रखडल्या आहेत. साहित्य, कला, क्रीडा, समाजकारण या क्षेत्रातील दिग्गजांची नियुक्त राज्यपाल विधान परिषदेसाठी करतात. या दिग्गजांचा समाजाला फायदा व्हावा, असा यामागचा उद्देश आहे. मात्र आता या नियुक्तीचा निर्णय आणखी पुढे ढकलला असून तो ४ जुलै रोजी होईल.