Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यटॅक्स पेअर ‘एआयएस’ आता मोबाइल ॲपवर

टॅक्स पेअर ‘एआयएस’ आता मोबाइल ॲपवर

  • उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत

येथे अधिक तपशीलवार माहिती असल्याने विवरणपत्र भरण्याचे काम सोपे होते. यात काही तांत्रिक अडचणी आहेत, जोपर्यंत हे सर्व सुरळीत होत नाही तोपर्यंत फॉर्म 26AS आणि AIS दोन्ही मिळत राहतील. कालांतराने फार्म 26 AS मिळणे बंद होऊन फक्त AIS च मिळेल.

थोडक्यात AIS ही आपली वैयक्तिक आर्थिक व्यवहारांची कुंडलीच आहे. असे असले तरी काही व्यवहार AIS मध्ये नसल्याचा वैयक्तिक अनुभव असल्याने येथे न नोंदणी झालेले अन्य व्यवहार असल्यास करदात्यांने ते स्वतः जाहीर करावेत, म्हणजे निश्चिन्त राहता येईल. प्रत्येकानेच यापुढे आपले व्यवहार करताना, कुणाला काय कळतंय? या भ्रमात राहू नये.

Taxpayer AIS App :
हे आयकर विभागाकडून देण्यात आलेले वरील नावाचे ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा. आपला पॅन व जन्मतारीख DD/MM/YYYY या पद्धतीने टाकून नियम, अटी मान्य करा. आपला मोबाइल क्रमांक आणि इमेल टाकून तो कन्फर्म करा. त्यावर येणारे OTP टाकून नेक्स्टवर क्लीक करा. तुमच्या पसंतीचा ४ अंकी पिन सेट करून कन्फर्म करा. आपले ॲप ॲक्टिव्ह झाले आहे.
आता लॉग इन करताना –
आपण सेट केलेला पिन टाका. आता Taxpayers AIS चे होम पेज त्यावर आपले पॅन कार्ड दिसेल. त्याखाली Annual Information Statement (AIS) असे दिसेल. त्यावर, या स्टेटमेंटमध्ये काही व्यवहार कदाचित दिसणार नाहीत. तेव्हा करदात्यांनी ते तपासून, मान्य करून आवश्यक असल्यास यथोचित दुरुस्ती करून आपले आयकर विवरणपत्र भरावे, असा संदेश प्रत्येकवेळी येईल (पॉप अप मेसेज) असा संदेश वारंवार येऊ नये, असे वाटत असल्यास दरवेळी हा संदेश पाठवू नये. यावर क्लीक केल्यास नंतर असा संदेश येणार नाही.

या AIS वर क्लीक केल्यास सन २०२०-२०२१ ते २०२२-२०२३ या तीन वर्षांचे Taxpayer Information Summery (TIS) आणि Annual Information Statement (AIS) दिसते. यातील TIS वर मिळालेला एकत्रित डिव्हिडंड, सेल केलेल्या शेअर/ म्युच्युअल फंड यांची मिळालेली निव्वळ किंमत समजेल आणि खरेदी केलेल्या शेअर्स/युनिटची निव्वळ खरेदी किंमत समजेल.
AIS वर क्लीक केल्यास – B1 TDS/TCS information येथे मुळातून आपल्याकडून किंवा आपण कापून घेतलेल्या कराची माहिती मिळेल.

*B2 SFT Information येथे विशेष आर्थिक व्यवहारांची माहिती मिळेल.
*B3 Payment of Taxes येथे कर भरणा केलेल्या कराची, मागील थकबाकीची माहिती मिळेल.
*B4 Demand & Refund येथे मागणी केलेला कर आणि दिलेला परतावा याबाबत माहिती आहे.
*B5 Other Information आयकर कायदा कलम 114/1(2) अंतर्गत आवश्यक माहिती मिळेल.

असे विविध पर्याय दिसतील, तेथे संबंधित वर्षांची त्या विषयाच्या संदर्भातली सर्व संबंधित माहिती मिळेल. या माहितीबद्दल आपली काही तक्रार असेल, तर त्याबद्दल आपला प्रतिसाद आपण इच्छिकरीत्या इथे देऊ शकतो, त्यासाठी वेगळा बॉक्स खाली आहे. येथे उपलब्ध असलेली पत्रके आणि आपला प्रतिसाद डाऊनलोड करण्यासाठी उजव्या बाजूस वर-खाली टोक असलेला बाण आहे. त्यावर क्लीक करून आपणास हवी असलेली माहिती डाऊनलोड करता येईल. होमवर खाली डाव्या हाताला आपण येथे येऊन नेमकं काय केलं Activity History शेजारी असलेल्या चॅटवर क्लीक केल्यास ताबडतोब मिळवायची सोय आहे. याच पानावर (होम पेज) वरती डावीकडे असलेल्या एन्टरवर (आडव्या तीन रेषा) क्लीक केले की, ॲपच्या अंतरंगात जाता येईल. तेथे एक मेन्यू असून त्याखाली-
युजर गाईड ॲप कसे वापरावे याची माहिती असलेली फाईल दिसेल. ती डाऊनलोड करता येईल. Frequently Asked Questions यात ॲप संदर्भातील सर्वसाधारण प्रश्न आणि त्यांची उत्तरे असतील. येथे नियम, अटी आहेत. *Disclaimer येथे आयकर विभागाने केलेले खुलासे आहेत. १८०० १०३ ४२१५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून त्याचा संदर्भ क्रमांक (टिकेट नंबर) तयार करता येईल. Share App येथून ॲप विविध ठिकाणी शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. Setting येथून आपला पिन बदलता येईल. त्याच पानावर खाली होम आणि ॲक्टिव्हिटी हिस्टरी येथे जाण्याची सोय आहे. Logout येथे क्लीक करून ॲपमधून बाहेर पडता येईल.

ही सर्व माहिती आपण www.incometax.gov.in या पोर्टलवरूनही मिळवू शकतो. तेथून हवी असलेली नेमकी माहिती मिळवणे नागरिकांना गुंतागुंतीचे वाटू शकते, त्या तुलनेत ॲप वापरून झटपट महिती मिळवता येईल. कोणतेही ॲप हे त्याच्या वापरकर्त्यास उपयुक्त होईल अशा पद्धतीचा एक निश्चित लिहिलेला प्रोग्रॅम असतो. त्या दृष्टीने हे ॲप करदात्यांच्या निश्चितच सोयीचे आहे. आपले विवरणपत्र दाखल करण्यासाठी जी काही आवश्यक माहिती लागते ती सर्व माहिती या ॲपवर उपलब्ध असल्याने ती मिळवण्यासाठी आता करदात्यांना धावपळ करावी लागणार नाही.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -