Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. २०२१ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर हा अत्यंत मोठा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे.


परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजवून दिली होती. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. विविध भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.


महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने मागे घेतला आहे. निलंबनासकट परमबीर सिंह यांच्यावर झालेले सर्व आरोपही मागे घेण्यात आले आहेत. पण निलंबनाच्या काळात परमबीर सिंह सेवानिवृत्त झाल्यामुळे निलंबन मागे घेतलं असलं तरी ते सेवेत पुन्हा रुजू होऊ शकत नाहीत.

Comments
Add Comment