मुंबई : दादरजवळील बाबासाहेब आंबेडकर रोडवरील परळ टीटी पूल बुधवारी, १० मे रोजी काही प्रस्तावित दुरुस्तीच्या कामाकरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. लोकांना कोणताही धोका किंवा अडथळा होऊ नये म्हणून हा पूल आता आणखी आठ दिवस म्हणजे २० मे पर्यंत बंद राहील.
“दुरुस्तीच्या कामादरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी परळ टीटी पुलावरील सर्व प्रकारच्या वाहनांसाठी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पुलाकडे जाणारा रस्ता बंद केला जाईल”, असे डीसीपी (दक्षिण) गौरव सिंह यांनी सांगितले.
“परळ टीटी उड्डाणपुलाच्या प्रस्तावित दुरुस्तीच्या कामाच्या दृष्टीने आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसंच लोकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियम १० मे पासून लागू केले जातील,” असं वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
उत्तरेकडील डॉ बीए रोडवरून दादर टीटीकडे जाणार्या वाहतुकीसाठी परळ टीटी पुलाचा स्लिप रोड आणि हिंदमाता पुलाचा स्लिप रोड हा पर्यायी मार्ग आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेकडील डॉ. बी.ए. रोडवरून भायखळ्याकडे जाणार्या वाहतुकीसाठी हाच पर्यायी मार्ग आहे.