Friday, October 31, 2025
Happy Diwali

ईडी चौकशीप्रकरणी जयंत पाटील यांनी मागितली मुदतवाढ

ईडी चौकशीप्रकरणी जयंत पाटील यांनी मागितली मुदतवाढ

मुंबई : आय.एल.एफ.एस प्रकरणी ईडीने काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लग्नाच्या वाढदिवशीच चौकशीसाठी नोटीस पाठवली. ही चौकशी आज होणार होती. मात्र घरात लगीनसराई असल्याने जयंत पाटील यांनी १० दिवसांची मुदतवाढ मागणारे पत्र ईडीला पाठवले.

"ईडी चौकशीसाठी आलेल्या नोटीसमध्ये काही कारण दिलेलं नव्हतं. पण फाईल्स काढून पाहिल्या असता त्यात आय.एल.एफ.एस नावाची कुठली तरी संस्था होती. जिच्याशी माझा आयुष्यात कधीच संबंध आला नाही किंवा मी या संस्थेकडून कर्ज घेतलेलं नाही. तरीही ही नोटीस आली त्यामुळे जी काही चौकशी असेल त्याला सामोरे जाऊ मात्र घरात जवळच्यांची लग्नं असल्याने ईडीकडे वेळ मागणारं पत्र मी पाठवत आहे", असं काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

आय.एल.एफ.एसच्या माध्यमातून अनेकांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. ईडीकडून या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं होतं, मात्र त्यांनी मुदतवाढीसाठी ईडीला पत्र पाठवलं आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >