Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणअब तेरा क्या होगा संजय राऊत?

अब तेरा क्या होगा संजय राऊत?

संजय राऊतांना पत्राचाळीतल्या मराठी माणसांचे शाप लागणार : नितेश राणे

कणकवली : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर संजय राऊत यांनी ‘नंगा नाच’ असा उल्लेख केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. संजय राऊत यांना अजून अक्कलदाढ आली नसल्याचं त्यांनी स्वतःच दाखवून दिलं आहे, असं नितेश राणे यावेळी म्हणाले. संजय राऊत जगातला सर्वात मोठा मूर्ख आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.

“नंगा नाच याबद्दल विश्लेषण कोणी करावं, तर संजय राऊत यांनी? तर मग मुंबईच्या आरे गेस्ट हाऊसमध्ये कोणता नंगा नाच होत होता याबद्दल त्यांनी माहिती द्यावी. दुसर्‍यांना नंगा बोलण्याआधी स्वतः कुठे कुठे कपडे काढले, याबद्दल सांगावं. नसेल जमत तर आम्ही नंगा नाच कशाला म्हणतात याची लिंक काही दिवसांत दाखवतो”, असे खडेबोल यावेळी नितेश राणेंनी सुनावले.

पुढे नितेश राणे म्हणाले, “आज सकाळच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दोन्ही अनिलचे आभार मानले. आम्हीदेखील अनिल परब, अनिल देसाई आणि संजय राऊत यांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरे आज संपलेला माणूस आहे. म्हणून या तिघांचा नागरी सत्कार करण्याची संधी आम्हाला द्यावी”. त्याचबरोबर प्रत्येक कोर्टामध्ये, निवडणूक आयोगाच्या प्रत्येक सुनावणीला हजर राहणारे अनिल देसाई कालच्या महत्त्वाच्या सुनावणीला कोर्टात का गेले नव्हते? असा सवाल उपस्थित करत हे उद्धव ठाकरेंना कळलं पाहिजे असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

हे सरकार बेकायदेशीर असून ते तीन महिनेच टिकणार आहे, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंनी आज पत्रकार परिषदेत सडेतोड प्रत्युत्तर दिले. “हे सरकार आता अधिक भक्कम झालंय. माननीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब महाराष्ट्र पुढे घेऊन जाणार आहेत”, असा विश्वास नितेश राणेंनी यावेळी दिला.

‘अब तेरा क्या होगा संजय राऊत?’ असा फिल्मी डायलाॅग मारत नितेश राणेंनी राऊतांना चांगलीच चपराक दिली आहे. सरकार तीन महिने टिकतंय की संजय राऊतांवर पुन्हा कैदी नंबर ८९, ५९ बनण्याची वेळ येतेय हे आपण बघू, असं नितेश राणे म्हणाले. संजय राऊतांना पत्राचाळीतल्या मराठी माणसांचे शाप लागणार, त्यांनी नैतिकतेची भाषा करु नये, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -