Monday, July 22, 2024
Homeक्रीडाIPL 2024विजयासाठी घमासान

विजयासाठी घमासान

कोलकाता-राजस्थान आज आमने-सामने

कोलकाता (वृत्तसंस्था) :
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील गटातील सामने आता अंतिम टप्प्यात आले आहेत. त्यामुळे प्लेऑफ प्रवेशाची रेस आता तीव्र झाली आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ गुरुवारी एकमेकांना भिडणार आहेत. ही लढत म्हणजे एक प्रकारे आभासी नॉकआऊट असल्याचे दिसते. पराभूत संघाच्या प्लेऑफ प्रवेशाच्या आशा जवळपास संपुष्टात येतील. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी जीवतोड खेळतील.

यंदाच्या हंगामाची खराब सुरुवात करणाऱ्या कोलकाताने आठव्या सामन्यापासून टॉप गिअर टाकला. या चार सामन्यांपैकी ३ सामने जिंकत त्यांनी प्लेऑफ प्रवेशाचा दरवाजा बंद होऊ दिला नाही, तर दुसरीकडे दमदार सुरुवात करणाऱ्या राजस्थानने पराभवाची हॅटट्रिक केल्याने अंतिम चार संघांमधील त्यांचा प्रवेश अवघड झाला आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ करो या मरो स्थितीत आहेत.

केकेआरचा संघ गोलंदाजीत फिरकीपटू वरुण चक्रवर्तीवर अवलंबून असेल. त्याने गेल्या दोन सामन्यांमध्ये संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनुभवी गोलंदाज सुनील नरेन विकेटसाठी झगडत असताना चक्रवर्ती संघासाठी हुकुमाचा एक्का ठरत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील सामन्याकरिता भारतीय संघात स्थान मिळालेल्या शार्दुल ठाकूरला पंजाबविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या सामन्यात कोलकाताची वेगवान गोलंदाजी कमजोर झाली. त्यामुळे राजस्थानविरुद्धच्या सामन्यात शार्दुलला गोलंदाजी करण्याची संधी मिळते का? ते गुरुवारीच कळेल. राजस्थान रॉयल्सचे यशस्वी जयस्वाल, जोस बटलर आणि संजू सॅमसन ही तिकडी शानदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे या तिघांना रोखण्याचे केकेआरच्या गोलंदाजांसमोर आव्हान आहे. राजस्थानलाही आपल्या वेगवान गोलंदाजी विभागाबाबत चिंता आहे. त्यामुळे त्यांना योग्य रणनिती आखून मैदानात उतरावे लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -