Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीराणी बागेत पर्यटकांसाठी नवे आकर्षण

राणी बागेत पर्यटकांसाठी नवे आकर्षण

सहा महिन्यांपूर्वी जन्म दिलेल्या नर बछड्यासोबत आणखी तीन पेंग्विन पर्यटकांना पाहता येणार

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा राणीबागेतील वाघांचे आणि पेंग्विनचे कुटुंब विस्तारले आहे. रॉयल बेंगॉल टायगरच्या जोडीने म्हणजेच ‘शक्ती आणि करिश्मा’ने ४ नोव्हेंबर रोजी दोन बछड्यांना जन्म दिला होता, तर पेंग्विन कक्षातही पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन गोंडस पेंग्विन पिले जन्माला घातली. या नव्या पाहुण्यांमुळे वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अधिक समृद्ध झाले आहे. आजपासून पर्यटक नवीन पाहुण्यांना पाहण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत.
सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक राणी बागेला भेट देत आहेत. त्यातील अनेकांना वाघ शक्ती आणि वाघीण करिश्मा यांना पाहण्याची खूप उत्सुकता असते. तसेच मागील काही वर्षांपासून आलेले पेंग्विन पाहण्यासाठीदेखील पर्यटक येतात. मात्र आता या दोन्ही ठिकाणी आलेल्या पाहुण्यांमुळे पर्यटकांचे नवीन आकर्षण ठरणार आहे. पेंग्विन कक्षातील पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक अशा तीन पिलांना जन्म दिला आहे. त्यामुळे पेंग्विनची संख्या वाढून आता एकूण १५ झाली आहे.

प्राणिसंग्रहालयातील वैद्यकीय पथकाने दोन्ही बछड्यांची नीट काळजी घेत त्यांचे वेळोवेळी लसीकरण आणि इतर महत्त्वाच्या तपासणी केल्या आहेत. सध्या हे दोघे लहान असल्याने त्यांच्यासाठी खाद्यगृहाचे दरवाजे खुले ठेवलेले असतात. तसेच जो मांसाहार करिश्माला पुरविला जात आहे तोच त्यांच्या बछड्याना दिला जात आहे. हे बछडे आणि तळ्यात आणि हिरवळीवर सैर करतात. आता पर्यटकांना एक दिवसाआड जय आणि रुद्रसह करिश्माला, तर दुसऱ्या दिवशी शक्तीला पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

सध्या प्राणिसंग्रहालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, संग्रहालयातील प्राणी यामुळे बाहेर येण्यास दचकतात. तसेच काही हौशी पर्यटक संग्रहालयातील प्राण्यांचे लक्ष वेधून घेण्याच्या नावाखाली काचेवर दणके मारतात, यामुळे प्राण्यांच्या रोजच्या राहणीमानात व्यत्यय येतो. पर्यटकांनी उत्साहात कोणताही नियमभंग करू नये, असे विनम्र आवाहन प्राणिसंग्रहालय प्रशासनाने केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -