पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व प्रमुख विरोधी पक्षनेते इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानात हिंसेचे हे सत्र सुरू झाले. इस्लामाबाद, रावळपिंडी, कराची, लाहोरसह पाकिस्तानच्या जवळपास सर्वच शहरांमध्ये आगडोंब उसळला. या देशाच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या घरांवरही हल्ले सुरू झाले. पेशावरमधील रेडिओ स्टेशन देखील पेटवून देण्यात आल्याची तेथील स्थानिक माध्यमातून माहिती पुढे येत आहे. इतकेच काय तर रावळपिंडीमधील लष्कराच्या मुख्यालयावर निदर्शकांनी हल्ले केले असून तिथेही तोडफोड झाली. एकूण या हिंसाचारात दहा ते बाराजण दगावल्याचे सांगितले जाते. खान यांनी आपल्या अटकेनंतर समर्थकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. त्याचे पडसाद तत्काळ उमटले. सध्या पाकिस्तानात हाहाकार माजला असून या देशात आणीबाणी जाहीर करण्याची वेळ आली आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला इम्रान खान यांना झालेली अटक कायदेशीर असल्याचे दावे करून पाकिस्तानचे सरकार व लष्कराने त्याचे समर्थन केले आहे. काल मंगळवारी इस्लामाबाद येथे न्यायालयात हजर राहण्यासाठी निघत असतानाच, इम्रान खान यांनी आपल्याला अटक होऊ शकते, असे एका व्हीडिओद्वारे जाहीर केले होते. ही अटक झाल्यानंतर आपल्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून याला विरोध करावा, असा संदेश देखील इम्रान खान यांनी दिला. त्यानुसार इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हिंसक निदर्शने सुरू केली. पाकिस्तानच्या जवळपास सर्वच प्रमुख शहरांमध्ये तोडफोड, जाळपोळ आणि हाणामारीचे सत्र सुरू झाले. पाकिस्तानी लष्करानेच इम्रान खान यांच्या अटकेसाठी पुढाकार घेतल्याने संतप्त जमावाने लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचे चित्र दिसले.
पाकिस्तान निर्मिती झाल्यापासून पाकिस्तानात लष्कराविरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला नव्हता. पण इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानात सर्वात प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या लष्करावरच हल्ले चढविले आहेत. पाकिस्तानच्या लष्करी तळांवर अगदी रावळपिंडीमधील लष्कराच्या मुख्यालयावर इम्रान खान यांच्या समर्थकांनी हल्ला चढविला. सरकारी कार्यालये देखील खान यांच्या समर्थकांच्या हल्ल्याचे लक्ष्य बनल्याचे दिसली आहेत. ज्या पद्धतीने इम्रान खान यांना सर्वांसमोर धक्काबुक्की करून ताब्यात घेण्यात आले, ते पाहता त्यांच्या जीवाला धोका असल्याची चिंता खान यांच्या समर्थकांना वाटत आहे. इम्रान खान यांचे काही बरेवाईट झाले तर सारे पाकिस्तान पेटवून देण्याची भाषा त्यांचे समर्थक करीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला इम्रान खान यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे असून त्यांची अटक न्याय्य ठरते, असा दावा अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्लाह यांनी केला आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कराचा अवमान करणारी विधाने व आरोप केल्याचा ठपका लष्कराने ठेवला आहे. एका लष्करी अधिकाऱ्याने आपल्याला ठार करण्याचा कट आखला होता, असा आरोप इम्रान खान यांनी केला होता. मात्र या आरोपामुळे लष्कराचा अपमान होत नाही, असे इम्रान खान यांचे म्हणणे आहे. तसेच पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांवर व त्यांच्या निवासस्थानावर होणारे हल्ले बनावट आहेत. पाकिस्तानी लष्करच हे हल्ले घडवून देशात मार्शल लॉ लागू करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप इम्रान खान यांच्या समर्थकांनी केला आहे. पाकिस्तानचे लष्कर व सरकार यांचा इम्रान खान यांच्याबरोबरील संघर्ष पाकिस्तानचे तुकडे पाडणारा ठरेल, असे इशारे तटस्थ निरीक्षकांना वाटते. आधीच अर्थव्यवस्था गाळात बुडालेली असताना, हे अराजक व अस्थैर्य पाकिस्तानच्या चिरफळ्या उडविल्यावाचून राहणार नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यात काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी देखील पाकिस्तानच्या नेत्यांना राजकीय विसंवाद संपविण्याचा परखड सल्ला दिला होता.
मंगळवारपासून निर्माण झालेल्या परिस्थितीवर कसा काबू मिळवायचा याचा विचार लष्कराकडून केला जात आहे. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी संपूर्ण पाकिस्तानात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच आता ट्विटर, फेसबुक आणि यूट्युब सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रातात लोक रस्त्यावर उतरून देशाच्या सदय परिस्थितीचे दर्शन घडवून देत आहे. पाकिस्तान देशावर एवढे कर्ज आहे की, ते व्याजावरील व्याज सध्या फेडू शकत नाही. मात्र जगातील महासत्ता देशांकडून पाकिस्तानाला रसद पुरविली जाते. त्यामुळे कधी चीन, तर कधी अमेरिकेतील नेतृत्व ही भारताच्या विरोधातील देश म्हणून पाकिस्तानला अप्रत्यक्ष मदत करत आल्याची उदाहरणे गेल्या काही वर्षांत पुढे आलेली आहे. एक हिंदी चित्रपटातील डॉयलॉग आहे. पाकिस्तान स्वत:च्या देशाच्या साधी सुई तयार करू शकत नाही, तर मग भारताला नामोहरण करण्याची स्वप्ने त्यांनी पाहू नयेत, कोरोना काळात जगात लॉकडाऊन करण्याचा निर्णय अनेक देशांनी घेतला होता. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांना लॉकडाऊन केले तर भूक बळी होईल अशी भीती वाटत होती. तसेच स्थानिक जनतेचा दबाव असल्याने इम्रान खान यांना तसा निर्माण घेता आला नव्हता. उलट लॉकडाऊन काळात भारतात ८० कोटी जनतेला मोफत अन्न पुरविण्याचे काम मोदी सरकारने केले होते. त्यामुळे आपण भारतात असतो तर सुखी असतो, अशा काही प्रतिक्रिया पाकिस्तानी जनतेने व्यक्त केल्या होत्या. आजही पाकिस्तानातील आर्थिक डोलारा कोसळलेला आहे. त्यात राजकीय अस्थिरतेचे प्रकरण समोर आल्याने, देशात कसे जगायचे हा प्रश्न सर्वसामान्य पाक जनतेला पडला असेल.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…