Wednesday, May 7, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

एक्झिट पोलचे आकडे : कर्नाटकात कुणालाही बहुमत नाही

एक्झिट पोलचे आकडे : कर्नाटकात कुणालाही बहुमत नाही

बंगळूरु (वृत्तसंस्था) : कर्नाटकातील मतदान आज संपले असून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. एबीपी न्यूज सी व्होटरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. कर्नाटक विधानसभेच्या एकूण जागा २२४ असून बहुमतासाठी ११३ आकड्यांचा मॅजिक फिगर आहे. काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरणार असून त्याला १०० ते ११२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सत्ताधारी भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहणार असून त्याला ८३ ते ९५ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याची शक्यता आहे. तर जेडीएसला २१ ते २९ जागा मिळण्याची शक्यता आहे.



एबीपी न्यूज सी व्होटरच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. पण काँग्रेस बहुमताच्या जवळ जाऊ शकते. काँग्रेसला १०० ते ११२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप राहणार असून भाजपला ८३ ते ९५ जागा मिळण्याची शक्यता आहे.


जेडीएसला किती जागा मिळणार?
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, धर्मनिरपक्ष जनता दल म्हणजे जेडीएसला २१ ते २९ जागा मिळण्याची शक्यता आहे. जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर कुमारस्वामी पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत. २०१७ साली अशीच परिस्थिती असताना कुमारस्वामींनी काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती.

Comments
Add Comment