मुंबई (प्रतिनिधी) : ठाण्यातील न्यू होरायझन शाळेत नेमण्यात आलेली पालक शिक्षक समिती (पीटीए) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पालकांचा विरोध असतांनादेखील ही समिती गठित करण्यात आल्यामुळे या समितीच्या नियुक्तीची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाकडून ठाणे शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे. ही शाळा गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्याला शिक्षा केल्याप्रकरणी चर्चेत आली होती. त्यामुळे या शाळेच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार असल्याची चिन्हे यावेळी दिसत आहे.
ठाण्यातील न्यू होरायझन शाळेच्या चौकशीचे बाल हक्क आयोगाकडून आदेश
शाळेच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार असल्याची चिन्हे