मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला असतानाच त्याला टीकेचाही सामना करावा लागत आहे. अशावेळी सासरेबुवा सुनील शेट्टी जावईबापूंसाठी धावून आले आहेत.
केएल राहुलला दुखापत झाली तेव्हा अथिया शेट्टी स्टेडियममध्ये उपस्थित होती. पतीची अशी अवस्था पाहून ती खूप घाबरली. आता त्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. अशावेळी केएल राहुलचे सासरे म्हणजेच बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यानेही तो लवकर बरा व्हावा यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच टीका करणाऱ्यांना उत्तर देतान सुनील शेट्टी म्हणाला, तो लढाऊ वृत्तीचा असून लवकरच मैदानावर परतणार आहे. तो लवकरच बरा होऊन दमदार पुनरागमन करेल, उद्या त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. तो लवकर बरे होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. भारतीय क्रिकेट संघात एकापेक्षा एक महान खेळाडू आहेत. प्रत्येकजण चांगले करतो. मला वाटते की यावेळी डब्ल्यूटीसीमध्ये खेळण्याची संधी दुसऱ्या कोणाला तरी मिळणार आहे ही देखील गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत आणि होत असतात त्यामुळे त्याकडे सहानुभूतीने पाहायला हवे.