Thursday, October 23, 2025
Happy Diwali

दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर

दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर

ख्रिस जॉर्डनला संघात स्थान

मुंबई (वृत्तसंस्था) : दुखापतीचा ससेमीरा मुंबईची पाठ सोडताना दिसत नाही. प्ले ऑफ प्रवेशाची शर्यत अधिक तीव्र झालेली असताना दुखापतीमुळे मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला आयपीएलच्या उर्वरित हंगामातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस जॉर्डनला संघात स्थान मिळाले आहे.

मुंबई इंडियन्सने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली. "ख्रिस जॉर्डन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील होणार आहे. जोफ्रा आर्चर सध्या दुखापतीचा सामना करत असून त्याला विश्रांतीची गरज आहे. म्हणून त्याच्या जागी जॉर्डनला संधी देण्यात आली आहे. जॉर्डनला आर्चरची रिप्लेस म्हणून मुंबईने घेतले आहे. आर्चरच्या रिकव्हरी आणि फिटनेसवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाद्वारे लक्ष ठेवले जात आहे. जोफ्रा आपल्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मायदेशी परतणार आहे", असे मुंबई इंडियन्सने स्पष्ट केले.

दुखापतीमुळे अनेक खेळाडू यंदाच्या हंगामाला मुकले आहेत. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर यंदाच्या हंगामातील काही सामने खेळलेला नाही. तसेच ज्या सामन्यांत तो खेळला त्या सामन्यांत त्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >