Tuesday, July 1, 2025

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर अटक करण्यात आली आहे. कादिरा ट्रस्ट केस प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. या आधी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना विदेशी राजकीय नेत्यांकडून मिळालेल्या सरकारी भेटी वैयक्तिक स्वार्थासाठी विकल्याप्रकरणी त्यांच्या अटकेचे प्रयत्न झाले होते. दरम्यान, अटकेपूर्वी इम्रान खान यांनी एक खळबळजनक व्हिडिओ जारी केला होता ज्यात त्यांच्याविरोधात कटकारस्थान केले जात असून लवकरच याची पोलखोल करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


खान यांचे सहकारी फवाद चौधरी यांनी इमरान खान यांच्या कारला घेराव घालण्यात आल्याचे एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला सांगितले आहे. न्यायालयाने याआधीही इम्रान यांच्या अटकेचा आदेश काढला होता. निवडणूक आयोगाने याप्रकरणात इम्रान यांना दोषी घोषित केलं होतं.


इम्रान खान यांना १६ मार्च रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. लाहोर हायकोर्टाने खान यांच्या घरासमोरील ऑपरेशन तात्पुरतं स्थगित करण्याचा आदेश दिला होता. पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी १८ ऑगस्ट २०१८ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यांचा कार्यकाळ ३ वर्षं आणि ७ महिने चालला.


इम्रान खान यांच्या पक्षाचे ट्वीट





इम्रान खान यांनी अटकेपुर्वी जारी केलेला व्हिडिओ

Comments
Add Comment