Friday, October 24, 2025
Happy Diwali

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

मुंबई : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी आकस्मित दुःखद निधन झाले आहे. पहाटे दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी २ वाजता ठेवण्यात येईल, त्यानंतर दुपारी ४ वाजता टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने अंत्ययात्रा निघेल.

विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. तसेच ते सांताक्रूझमधील राजे संभाजी विद्यालयाचे माजी प्राचार्य होते.२००२ मध्ये ते सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. महाडेश्वर हे २०१७ ते २०१९ पर्यंत मुंबईचे महापौर होते. स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. ते नागरिक शिक्षण समितीचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्या निधनाने ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >