Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

वडेट्टीवार विरुद्ध पटोले त्यात भुजबळांची फोडणी, महाविकास खरंच मजबूत?

वडेट्टीवार विरुद्ध पटोले त्यात भुजबळांची फोडणी, महाविकास खरंच मजबूत?

महाविकास आघाडीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर

मुंबई: महाविकास आघाडीमधील धूसफूस वारंवार चव्हाट्यावर येत असतानाच आता काँग्रेसमध्येच विजय वडेट्टीवार विरुद्ध नाना पटोले हा कलगीतूरा पाहायला मिळत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनीही फोडणी घातली आहे. कहानी मी ट्वीस्ट म्हणजे यावेळी भुजबळांचे लक्ष्य संजय राऊत नसून पृथ्वीराज चव्हाण आहेत.

आमच्या सगळ्या नेत्यांनी जिभेवर संयम ठेवावा. त्यामुळे आघाडी मजबूत होईल, असा सल्ला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला. त्यावर वडेट्टीवारांचा बंद खोलीत निर्णय करू म्हणत नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधत छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीत मिठाचे खडे टाकू नयेत, असा टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांचा राजीनामा ते अजित पवारांची नाराजी यावर आतापर्यंत वारंवार भाष्य केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनीही आज संजय राऊतांना फटकारले. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष केले.

ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडीची सत्ता का गेली. जोपर्यंत काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे जोपर्यंत एकत्रित आहेत. तोपर्यंत कोणी काही बोलले, तर त्याकडे फार लक्ष द्यायचे कारण नाही. आपल्या नेत्यांनी ज्या प्रमाणे ठरवले आहे, त्याप्रमाणे खालच्या लोकांना काम करायचे आहे. त्याच्यामध्ये कोणी मिठाचे खडे टाकू नयेत, असा टोला त्यांनी चव्हाणांना हाणला.

पृथ्वीराज चव्हाण कर्नाटक निवडणुकांच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम असल्याचं म्हणाले होते.
Comments
Add Comment