Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

'द काश्मीर फाईल्स'बाबत वक्तव्याप्रकरणी ममता बॅनर्जी अडचणीत

'द काश्मीर फाईल्स'बाबत वक्तव्याप्रकरणी ममता बॅनर्जी अडचणीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काश्मीर फाईल्स या चित्रपटाला अपप्रचार करणारा चित्रपट म्हटल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावली आहे. खुद्द अग्निहोत्री यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. ममता बॅनर्जी यांनी सोमवारी 'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्याची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचाही उल्लेख केला होता, असं अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे.


ममता बॅनर्जी यांनी विवेक अग्निहोत्री यांच्य 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटासमवेत त्यांच्या आगामी बंगाल नरसंहारावरील चित्रपटावरही आरोप केले आहेत, हे दुखावणारे असून या कारणास्तव त्यांनी ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली असल्याचं विवेक अग्निहोत्री म्हणाले. त्यांच्या भाषणादरम्यान केलेल्या आरोपांमध्ये काय तथ्य आहे यासंदर्भात नोटीसीतून उत्तर मागण्यात आलंय.
दरम्यान, 'द केरळ स्टोरी'चे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनीही बंगालमधील बंदीला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


विवेक अग्निहोत्री यांनी यांनी यासंदर्भात एएनआयशी संवाद साधला. ते म्हणाले “मी गेल्या काही दिवसांपासून शांत होतो. कोणीही मुख्यमंत्री, मग दिल्लीचे मुख्यमंत्री असो, मोठे, पत्रकार, राजकारणी कधीही उठून काश्मीर फाईल्स प्रपोगंडा फिल्म म्हणतात. आता हे अति झालं असं मला वाटतं. असं बोलणऱ्यांनी या चित्रपटातील कोणता डायलॉग, सीन किंवा सत्य प्रपोगंडा आहे हे सिद्ध करावं. आमच्याकडून आम्ही कठोर कायदेशीर कारवाई करू.”






Comments
Add Comment