Monday, May 19, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

उमेश यादव, उनाडकट दुखापतग्रस्त

उमेश यादव, उनाडकट दुखापतग्रस्त

डब्ल्यूटीसीच्या फायनलसाठी राहुलच्या जागी किशन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलचा थरार ७ जूनपासून रंगणार आहे. हा सामना जवळ येत असताना खेळाडूंच्या दुखापतीमुळे बीसीसीआयच्या निवड समितीची डोकेदुखी वाढली आहे. केएल राहुल पाठोपाठ उमेश यादव आणि जयदेव उनाडकट हे दोन गोलंदाज दुखापतग्रस्त झाले आहेत. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली. राहुलच्या जागी ईशान किशनला संधी देण्यात आली आहे.


डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. जयदेव सध्या बेंगलोर एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे. जयदेव उनाकटच्या फिटनेस चाचणीनंतर सहभागाबद्दल निर्णय घेण्यात येईल. त्याशिवाय उमेश यादव याला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. आयपीएलमधील २६ एप्रिलला झालेल्या कोलकाता आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान उमेशला दुखापत झाली होती. कोलकाताची मेडिकल टिम उमेश यादवच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. बीसीसीआयचेही मेडिकल पथक उमेश यादवच्या संपर्कात आहे. उमेश यादवच्या फिटनेसवर बीसीसीआयचे लक्ष आहे.

Comments
Add Comment