Friday, January 16, 2026

आयपीएस अधिकारी महेश पाटील आणि सुनिल कडासने यांच्या बदल्या

आयपीएस अधिकारी महेश पाटील आणि सुनिल कडासने यांच्या बदल्या

मुंबई: गेल्या आठवड्यात गृह विभागाने अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नंतर आज (दि. ८) रोजी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस अधिकारी महेश पाटील आणि सुनिल कडासने या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

महाराष्ट्र एटीएसचे पोलीस उप महानिरीक्षक महेश पाटील यांची बदली ठाणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर नागपूर लोहमार्ग पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांची बदली बुलढाणा पोलीस अधिक्षकपदी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >