Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

सांगलीत ब्रिजभूषण यांचा पुतळा जाळून निषेध

सांगलीत ब्रिजभूषण यांचा पुतळा जाळून निषेध
सांगली : ब्रिजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर जंतरमंतर येथील आंदोलक आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाला महाराष्ट्रातून क्रीडाप्रेमी व महिला कुस्तीपटूंचा पाठिंबा मिळत आहे.

सांगलीत ब्रिजभूषण यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळेस 'ब्रिजभूषण मुर्दाबाद, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे' अशी घोषणाबाजी सुरु होती. ब्रिजभूषण यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि राज्य श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे आणि क्रीडापटूंनी केली.

तर दुसरीकडे जंतरमंतर येथील आंदोलक कुस्तीपटूंना किसान सभेचा जोरदार पाठिंबा मिळतोय. आज आंदोलनादरम्यान कुस्तीपटू व शेतकर्‍यांनी आक्रमक होऊन बॅरिगेट्स तोडले. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी ते करत आहेत.
Comments
Add Comment