डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीसाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून संधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकरिता बीसीसीआयने ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि मुकेश कुमार यांची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड केली. बीसीसीआयने सोमवारी संध्याकाळी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.
चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादव बॉर्डर बावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक कसोटी सामना खेळून बाहेर गेला होता. त्याला एकदिवसीय सामन्यातही लय सापडली नाही. आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यात तो फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. या दोघांचीही आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली.