Monday, July 15, 2024
Homeदेशलष्काराचे मिग 21 कोसळून अपघात, ४ ठार एक जखमी

लष्काराचे मिग 21 कोसळून अपघात, ४ ठार एक जखमी

जयपूर : राजस्थानच्या हनुमानगड येथे लष्कराचं मिग 21 हे विमान कोसळ्यानं झालेल्या दुर्घटनेत चार ग्रामस्थांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. हनुमानगड येथील बहलोल नगर गावात ही दुर्घटना घडली. विमान कोसळत असताना पायलटने विमानातून उडी घेतल्याने तो बचावला. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली आहे.

विमानाचा अपघात होणार असल्याचं कळाल्यानंतर पायलटने हे विमान गावाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी विमान अपघात झाला असता तर अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका घरावर हे विमान कोसळलं. तेव्हा घराच्या बाहेर मुलं खेळत होती.

या फायटर जेटने सूरतगड एअर बेसवरून उड्डाण घेतलं होतं. उड्डाण घेतल्यानंतर १५ मिनिटात तांत्रिक बिघाडामुळे पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटलं. पायलटने विमानाला गावापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही या अपघातात एका महिलेला जीव गमवाला लागला. ही महिला जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -