Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेठाण्यात चार महिन्यांत ३७६ आगींच्या घटना

ठाण्यात चार महिन्यांत ३७६ आगींच्या घटना

नागरिकांनी घरातील केबल तसेच उपकरणांची तपासणी करून घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यामध्ये चार महिन्यांत तब्बल ३७६ आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये प्रामुख्याने शॉर्ट सर्किट होऊन याचे रूपांतर मोठ्या आगीच्या घटनांमध्ये झाले असल्याचे समोर आले आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे विजेचा वापरही अधिक प्रमाणात होऊ लागल्याने उपकरणांमधील बिघाडांमुळे या आगी लागत असून व्यावसायिकांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी घरातील केबल तसेच उपकरणांची तपासणी करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

कापूरबावडी येथील बिजनेस पार्कला लागलेली आग, मानपाडा येथील प्लायवूडच्या दुकानाला तसेच उपवन येथील सूर संगीत या बारला लागलेली आग काही जवळची उदाहरणे असून मे महिन्यातील सहा दिवसांमध्ये १२ आगीच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात विजेचा वापराचा वाढला असून त्याचा ताण घर व कार्यालयातील वीज पुरवठा करीत असलेल्या वायरींगवरदेखील दिसून येतो. वायरींग जुनी झालेली असेल, एसीचा लोड सहन करण्याची क्षमता नसेल तर, अशी जुनी वायर जास्त भाराने तुटून शॉर्ट सर्किट होण्याची देखील जास्त शक्यता असते.

१५०० वॅट क्षमतेचा एसी प्रति दिन किमान ६ तास जरी चालवला तरी, महिन्याला जवळपास २७० युनिट विजेचा वापर होतो. घरी एअर कुलर असेल आणि तो दिवसातून किमान ८ तास चालवला तर, महिन्याला जवळपास ४२ युनिटची भर बिलात होऊ शकते. ज्यांच्या घरी गिझर आहे, त्यांचेदेखील महिन्याला अंदाजे १०० युनिट वाढू शकतात.

ठाणे शहरावरील ताण मागील काही वर्षांत वाढलेला आहे. त्यामुळे नवनवीन मोठमोठी गृहसंकुले, हॉटेल, बिझनेस हब ठाण्यात उभी राहत आहेत. त्यातून विजेचा वापरही वाढला आहे. त्यात मार्चपासूनच ठाण्याचे तापमान ४२ अंशांपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. एप्रिल आणि मे महिन्यातदेखील पारा वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढून एसी, पंखे व इतर विजेची उपकरणे सलग सुरु राहत आहेत. त्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. कापुरबावडी येथे बिझनेस पार्कला लागलेली आग देखील शॉकसर्किटमुळे लागल्याचे दिसून आले. त्यानंतर मानपाडा येथे फर्निचर दुकानातदेखील अशाच पद्धतीने आग लागल्याचे दिसून आले. उपवन येथे हॉटेलला देखील आग लागली होती.

दरम्यान, आग लागण्याच्या प्रमुख कारणांमध्ये वातानुकूलित यंत्रणा वेळच्या वेळी सर्व्हीसींग न करणे, वीजेची उपकरणांची तपासणी योग्य वेळेत न करणे आदी कारनांमुळे आगीच्या घटना घडत असल्याचे तज्ञांचे म्हणने आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वेळच्यावेळी सर्व्हींसीग आणि विजेची उपकरणे दुरुस्त करणे गरजेचे आहे. घरातील पंखे व एसीचा वापरही वाढला आहे. परंतु त्यांच्या सर्व्हींसीगकडे दुर्लक्ष केल्यास अशा घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाणे महापालिका हद्दीत लागलेल्या आगींचा तपशील :- 
जानेवारी – ६७

फेब्रुवारी – ११५

मार्च – ९५

एप्रिल – ८७

मे (५ मेपर्यंत) – १२

एकूण – ३७६

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -